- ऑस्कर विजेते निर्माते जॉन लँडो यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले.
- ‘अवतार’चे दोन भाग आणि ‘टायटॅनिक’ या दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्यासोबत आतापर्यंतच्या तीन सर्वांत मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती.
- लँडो यांच्या कारकिर्दीस सन 1980 च्या दशकात प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून सुरुवात झाली.
- ‘हनी आय श्रंक द किड्स’ आणि ‘डिक ट्रेसी’साठी त्यांनी सहनिर्माता म्हणून काम केले.
- जागतिक बॉक्स ऑफिसवर एक अब्ज डॉलरची कमाई करणारा ‘टायटॅनिक’ पहिला चित्रपट ठरला आणि त्याने सर्वोत्कृष्ट चित्रासह 11 ऑस्कर जिंकले.




