- आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा 1923 पासून आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीद्वारे जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जाणारा सहकारी चळवळीचा वार्षिक उत्सव आहे.
- 2024 मध्ये 102 वा आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस आणि संयुक्त राष्ट्रांनी मान्यता प्राप्त 30 वा आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस म्हणून साजरा केला जात आहे
- 2024 ची थीम : ” सहकारिता सर्वांसाठी एक चांगले भविष्य घडवणारी”
- 16 डिसेंबर 1992 रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ठराव घोषित केला.
- “जुलै 1995 चा पहिला शनिवार आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस म्हणून घोषित केला गेला, जो आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या स्थापनेच्या शताब्दी निमित्त आहे.”
- 1995 पासून संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय सहकार दिन संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय सहकार दिनासोबत साजरा केला जातो.
- जगभरातील सहकारी संस्था विविध पद्धतीने हा दिवस साजरा करतात.
- गुजरातमध्ये गांधीनगर इथे 102 व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त ‘सहकार से समृद्धी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले.




