- भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला लक्षणीयरीत्या बळकट करण्याकरिता भारतीय रेल्वेच्या वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठ (जीएसव्ही) आणि एअरबस यांनी सहकार्य करार केला.
- सप्टेंबर 2023 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने, रेमी मेलर्ड (एअरबस भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक) आणि प्रा. मनोज चौधरी (गतीशक्ती विद्यापीठाचे कुलगुरू) यांच्यात नवी दिल्लीतील रेल्वे भवन येथे अंतिम करार झाला.
- रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि गतीशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलपती अश्विनी वैष्णव, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.




