- सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे (एसकेएम) अध्यक्ष प्रेमसिंग तमांग यांनी सिक्कीमच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- गंगटोकमधील पालजोर स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
- 56 वर्षीय तमांग सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.
- पीएस गोळे या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
- एसकेएम पक्षाने सिक्कीम विधानसभा निवडणुकीत 32 पैकी 31 जांगा जिंकल्या.
- या राज्यात 2019 पर्यंत सलग 25 वर्षे राज्य करणाऱ्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाला केवळ एकच जागा मिळाली.
- सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) चा सफाया केला.
- 25 वर्षे (1994-2019) सत्तेत असलेल्या SDF ला यावेळी फक्त एक जागा मिळाली.
केंद्रीय मंत्रिमंडळ (कॅबिनेट)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी – कार्मिक, नागरी तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा विभाग, अवकाश विभाग; तसेच अन्य मंत्र्यांकडे नसलेले सर्व विभाग.
- राजनाथसिंह – संरक्षण
- अमित शहा – गृह, सहकार
- नितीन गडकरी – परिवहन, महामार्ग
- जे. पी. नड्डा – आरोग्य, कुटुंब कल्याण, खते आणि रसायन
- शिवराजसिंह चौहान – कृषी, शेतकरी कल्याण, ग्राम विकास
- निर्मला सीतारामन – अर्थ आणि कंपनी कामकाज
- डॉ. एस. जयशंकर – परराष्ट्रमंत्री
- मनोहरलाल खट्टर – गृहनिर्माण आणि ऊर्जा
- पीयुष गोयल – वाणिज्य आणि उद्योग
- धर्मेंद्र प्रधान – शिक्षण
- सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग
- डॉ. वीरेंद्रकुमार – समाजकल्याण आणि सामाजिक न्याय
- प्रल्हाद जोशी – ग्राहक, अन्नधान्य सार्वजनिक वितरण, नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा
- जुएल ओराम – आदिवासी
- गिरिराजसिंह – वस्त्रोद्योग
- अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
- ज्योतिरादित्य शिंदे – दूरसंचार, ईशान्य विकास
- भूपेंद्र यादव – पर्यावरण, वने आणि हवामान बदल
- गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य, पर्यटन
- अन्नपूर्णा देवी – महिला व बालकल्याण
- किरेन रिजिजू – संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक
- हरदीपसिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
- डॉ. मनसुख मांडविया – कामगार आणि रोजगार, क्रीडा आणि युवा कल्याण
- जी. किशन रेड्डी – कोळसा आणि खाण
- सी. आर. पाटील – जलशक्ती
- एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग आणि पोलाद
- किंजारपु राम मोहन नायडू – नागरी विमान वाहतूक
- चिराग पासवान – अन्नप्रक्रिया उद्योग
- जीतनराम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
- राजीव रंजन सिंह – पंचायती राज, मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय



