- जगामध्ये बालकांना कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळालाच पाहिजे हा जागतिक बालकामगार विरोधी दिनामागचा मुख्य उद्देश आहे.
- जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 12 जून 2002 रोजी केली.
- बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो.
- थीम: “चला आपल्या वचनबद्धतेवर कार्य करूया: बालमजुरी समाप्त करा!”
इतिहास:
- आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही संयुक्त राष्ट्रांची शाखा आहे. ही संघटना कामगार आणि कामगारांच्या हक्कांसाठी नियम बनवते, त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला यासाठी अनेक वेळा पुरस्कारही देण्यात आला आहे.
- आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर बाल कामगार थांबविणे किंवा बंदी घालण्याचा आग्रह धरला होता.
- त्यानंतर 2002 मध्ये सर्वानुमते कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे श्रम करणे हा गुन्हा मानला जातो. यावर्षी प्रथमच 12 जून रोजी बाल कामगार निषेध दिन साजरा करण्यात आला.



