- यकृतामध्ये मोठ्या प्रमाणात चरबी साचल्याने होणारा ‘फॅटी लिव्हर’ या आजाराचे प्रमाण देशात वेगाने वाढत आहे. त्याचे लवकर निदान आणि प्रभावी उपचार करण्यास प्राधान्य देण्यात यावे तसेच फॅटी लिव्हर विषयी जनजागृती व्हावी म्हणून 13 जून हा दिवस दर वर्षी ‘फॅटी लिव्हर दिन’ म्हणून साजरा केला जातो.
‘फॅटी लिव्हर’ची कारणे ?
- आहारातील फॅट्सचे योग्य पद्धतीने विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते.
- आहारात अतिप्रमाणात साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे. त्या तुलनेत कमी व्यायाम करणे; तसेच स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड या कारणांमुळे यकृतातील चरबी वाढते.
‘फॅटी लिव्हर’ म्हणजे काय ?
- यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यास त्याला ‘फॅटी लिव्हर’ म्हणतात.
- यकृतामध्ये साचलेल्या चरबीचे वजन यकृतापेक्षा पाच टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर त्यालाही ‘फॅटी लिव्हर’ म्हटले जाते.
- यकृतातील वाढत्या चरबीकडे लक्ष दिले नाही, तर यकृताचा आजार होण्याची शक्यता असते.



