‘माया दर्पण’, ‘चार अध्याय’ आणि ‘कसबा’ यासारखे सकस कलात्मक चित्रपट देणारे दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. शाहनी यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारताच्या सिंध प्रांतामधील लारकानात झाला. फाळणीनंतर शाहनी कुटुंब मुंबईला आले.त्यांनी पुण्याच्या ‘फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ येथे चित्रपटाचे शिक्षण घेतले.
अधिक माहिती
● मणी कौल हे कलात्मक चित्रपटांचे दिग्दर्शक हे त्यांचे सहाध्यायी होते.
● शाहनी यांनी 1972 मध्ये ‘माया दर्पण’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन कारकिर्दीला सुरुवात केली.
● निर्मल – वर्मा यांच्या लघुकथेवर आधारित या चित्रपटामध्ये संरजामशाही भारतातील पित्याची प्रतिष्ठा आणि प्रियकर यांच्यादरम्यान अडकलेल्या स्त्रीची कथा मांडण्यात आली होती.
● यानंतर त्यांनी अमोल पालेकर आणि स्मिता पाटील यांना मुख्य भूमिकांमध्ये घेऊन 1984मध्ये ‘तरंग’ हा चित्रपट केला.या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.



