पासपोर्टचे रैंकिंग करणाऱ्या ‘हेन्ले’ या संस्थेने 2024 चा पासपोर्ट इंडेक्स जारी केला असून, त्यानुसार फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वांत ताकदवान पासपोर्ट ठरला आहे. भारत या यादीत 85 व्या स्थानावर आहे. फ्रान्ससोबत जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेनचे पासपोर्ट सर्वांत ताकदवान ठरले आहेत.
अधिक माहिती
● या यादीत पाकिस्तानचा क्रमांक 106 वर आहे. तो गेल्या वर्षीही याच क्रमांकावर कायम होता. बांगलादेशचे स्थान 101 वरून 102 वर घसरले आहे.
● चीनचा क्रमांक 66 वरून दोनने वर सरकून आता 64 झाला आहे.
● अमेरिकेचा क्रमांक 7 वरून आता 6 झाला आहे.
● भारताचा शेजारी मालदीवचा पासपोर्ट भारताहून बलवान आहे.
● मालदीवचा क्रमांक 58 असून, मालदीवच्या पासपोर्टवर जगातील 96 देशांत व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकतो.
हेन्ले पासपोर्ट इंडेक्स (HPI)
● हे त्या देशाच्या सामान्य पासपोर्ट धारकांनी तेथील नागरिकांसाठी उपभोगलेल्या प्रवास स्वातंत्र्यानुसार देशांचे जागतिक रँकिंग आहे.
● 2006 मध्ये Henley & Partners Visa Restrictions Index (HVRI) म्हणून सुरू झाले आणि जानेवारी 2018 मध्ये बदलून Henley passport index नाव देण्यात आले.
● मुख्यालय : लंडन



