श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड जळगाव, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 30 डिसेंबर दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात करण्यात आले आहे.
• या कार्यक्रमात पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना प्रदान केला जाणार आहे.
• संस्थेने यावर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शेती, शिक्षण सहकार, ग्रामीण विकास, सामाजिक काम या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पाच लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे.
• यावर्षीचा हा पहिला पुरस्कार अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ घडवणारे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 27 डिसेंबरला श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जाईल.
• डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे छायाचित्र असलेले 125 रुपयांचे नाणे केंद्र सरकारच्या वतीने काढण्यात येणार आहे.



