Shopping cart

shape
shape

फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी

  • Home
  • Current Affairs
  • December 2023
  • फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील विमान चाचणी केंद्रातून स्वदेशी हाय-स्पीड फ्लाइंग-विंग यूएव्हीची स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची घेतलेली उड्डाण चाचणी यशस्वी झाली. या स्वायत्त स्टेल्थ यूएव्हीचे यशस्वी उड्डाण प्रात्यक्षिक हे देशातील तंत्रज्ञान सज्जतेच्या पातळीच्या परिपक्वतेची साक्ष आहे.

• यासह, ज्यांनी फ्लाइंग विंग कॉन्फिगरेशनवर नियंत्रण मिळवले आहे त्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
• हे युएव्ही डीआरडीओच्या विमान विकास आस्थापनाने डिझाइन आणि विकसित केले आहे.
• या विमानाचे पहिले उड्डाण प्रात्यक्षिक जुलै 2022 मध्ये करण्यात आले त्यानंतर दोन अंतर्गत उत्पादित मूळ नमुने वापरून विविध विकासात्मक कॉन्फिगरेशनमध्ये सहा उड्डाण चाचण्या करण्यात आल्या.
• या उड्डाण-चाचण्यांमुळे मजबूत वायुगतिकीय आणि नियंत्रण प्रणाली, एकात्मिक रिअल-टाइम आणि हार्डवेअर-इन-लूप सिम्युलेशन आणि अत्याधुनिक ग्राउंड कंट्रोल स्टेशन विकसित करण्यात यश आले आहे.
• अंतिम कॉन्फिगरेशनमधील यशस्वी सातव्या उड्डाणासाठी विमान इलेक्ट्रॉनिक्स (एव्हीओनिक) प्रणाली, एकीकरण आणि उड्डाण परिचालन कार्यान्वित केले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *