अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनुदानात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार संमेलन आयोजनासाठी महामंडळाला दोन कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
• साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या खर्च लक्षात घेऊन सरकारने अनुदान वाढ करण्याची मागणी साहित्य वर्तुळातून होत होती.
● मंत्रिमंडळाच्या बैठकीत साहित्य संमेलन आयोजनासाठी सध्या दिल्या जाणाऱ्या 50 लाख रुपयांच्या अनुदानात वाढ करून आता दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
● 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव मधील अमळनेर या ठिकाणी भरविण्यात येणार आहे.



