देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मिळणार आहे. बारणे यांची तालिका अध्यक्षपदाच्या पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे.
● लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात बारणे यांच्या नावाची घोषणा केली.
● संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तालिका अध्यक्षांचे पॅनल जाहीर केले.
● सभागृहात अध्यक्ष उपस्थित नसल्यास उपाध्यक्ष कामकाज पाहतात.परंतू लोकसभेत उपाध्यक्षांची निवड करण्यात आली नाही.त्यामुळे अध्यक्षांच्या अनुपस्थितीत तालिका अध्यक्ष कामकाज पाहतात.
● सभागृहातील कामकाजातील चमक, अनुभव आणि जेष्ठता या निकषांवर तालिका अध्यक्षांची निवड केली जाते.
● लोकसभा अध्यक्षांनी खासदार बारणे यांची तालिका अध्यक्षांच्या पॅनेलवर निवड केली आहे.
● त्यामुळे बारणे यांना पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी मिळणार आहे.
● खासदार बारणे हे सलग दुसऱ्या वेळी खासदार आहेत.



