Shopping cart

shape
shape

मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदी लालदुहोमा

झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) चे नेते लालदुहोमा (73 वर्षे) मिझोरामचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. 8 डिसेंबर, 2023 रोजी त्यांनी राजधानी एझॉलमध्ये राज्याचे 6 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लालदुहोमा व्यतिरिक्त राज्यपाल हरी बाबू कंभंपती लालदुहोमा यांनी मंत्रिपदासाठी पक्षाच्या इतर काही नेत्यांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे ते राज्यातील पहिले बिगर-काँग्रेस आणि बिगर MNF मुख्यमंत्री आहेत.

लालदुहोमा यांच्याविषयी…
● ‘लालदुहोमा’ हे 1977 च्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आहेत.
● 1982 मध्ये दिल्लीत झालेल्या एशियाडच्या सुरक्षाव्यवस्थेत त्यांनी भूमिका बजावली होती.
● तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्यांनी काम केले होते.
● पोलीस दलाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
● 1984 मध्ये लालदुहोमा हे काँग्रेसच्या वतीने मिझोरम मधून लोकसभेवर निवडून आले होते.
● राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पक्षांतर बंदी कायदा लागू झाल्यावर अपात्र ठरणारे लालदुहोमा हे अपात्र ठरणारे पहिले खासदार ठरले होते.
● पुढे मिझोरम विधानसभेत पक्षांतरबंदी कायद्यान्वये त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
● अपक्ष म्हणून निवडून येऊनही झेडपीएमचे अध्यक्षपद भूषविल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *