Shopping cart

shape
shape

कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न

बिहारचे माजी मुख्यमंत्री समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
कर्पुरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी समस्तीपुर जिल्ह्यातील एका गावात न्हावी समाजात झाला. पीडित आणि दलितांचा आवाज अशी ओळख असलेल्या ठाकूर यांनी डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979 या कालावधीत बिहारचे मुख्यमंत्री पद भूषवले होते.

अधिक माहिती
● त्यापूर्वी 1967 मध्ये ते तत्कालीन बिगर काँग्रेस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
● त्यावेळी त्यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती.
● कर्पूरी ठाकूर हे 1952 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
● मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे मर्यादा वाढविण्याची शिफारस करणाऱ्या मुंगेरीलाल आयोगाने केली होती. त्याची अंमलबजावणी त्यांनी केली.
● त्यांनी मागासवर्गीयांसाठी 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
● या निर्णयाने त्यांची प्रतिमा बिहारमध्ये जननायक म्हणून तयार झाली.
● मॅट्रिकच्या परीक्षेत इंग्रजी विषयाची सक्ती रद्द करण्याचा निर्णय ही त्यांनी घेतला होता.
● त्यांना देशातील ओबीसी आणि ईबीसी आरक्षणाचे प्रवर्तक मानले जाते.
● ठाकूर यांना जननायक असेही संबोधले जाते.
● ठाकूर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण सोडले आणि 1942 ते 1945 दरम्यान भारत छोडो आंदोलनात भाग घेतला.त्याबद्दल त्यांना अटक झाली होती.
● समाजवादी चळवळीचे नेते राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती.
● जयप्रकाश नारायण यांच्याही ते जवळचे होते.
● सन 1988 मध्ये ठाकूर यांचे निधन झाले.
● त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मूळ गावाला ‘कर्पुरी ग्राम’ असे नाव देण्यात आले.
● भारतरत्न पुरस्काराचे कर्पुरी ठाकूर हे 49 वे मानकरी ठरले आहेत.
● भारतरत्न सन्मानाने आतापर्यंत 48 जणांना गौरविण्यात आले आहे .
● स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी, शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण, आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 मध्ये सर्वप्रथम सन्मानित करण्यात आले होते.
● नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत गेल्या दहा वर्षात प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, नानाजी देशमुख, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न यांनी सन्मानित केले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *