भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(इस्रो) ‘रियुजेबल लाँच व्हेईकल’चे ‘ऑटोनॉमस लँडिंग मिशन’ (आरएलव्ही एलईएक्स) यशस्वीपणे राबविले. कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे चाचणी घेण्यात आली. या चाचणीद्वारे इस्रोने प्रेक्षपकाचे स्वयंचलित पद्धतीने लँडिंग करण्यात यश मिळवले आहे. तसेच यामुळे पुनर्वापर करता येणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने ‘इस्रो’ ने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.या चाचणीसाठी विविध उच्चतंत्रज्ञानाचा वापर केला गेला. त्यातील काही तंत्रज्ञान ‘इस्रो’नेच विकसित केले होते.
अशी केली चाचणी :
‘आरएलव्ही’ हे एक अवकाश विमान आहे. हे विमान हवाई दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरच्या मदतीने जमिनीपासून 4.6 किलोमीटर उंचीवर नेण्यात आले. एका विशिष्ट कोनातून 350 किमी प्रतितास या वेगाने ते धावपट्टीच्या दिशेने सोडणे आवश्यक होते. त्यानुसार, योग्य उंची, कोन आणि वेग साध्य होताच ‘आरएलव्ही’ च्या मिशन मॅनेजमेंट कॉम्पुटरने दिलेल्या आदेशानुसार हे अवकाश विमान सोडण्यात आले.
काय साध्य करण्यात आले :
प्रक्षेपक पृथ्वीच्या दिशेने परत येताना त्याचा असणारा वेग आणि इतर स्थितीनुसारच सर्व परिस्थिती निर्माण करून ही चाचणी घेण्यात आली. प्रेक्षपकाचा वेग, त्याच्या गिअर्सचा सिंक रेट, त्याचा जमिनीशी असलेला कोन आणि इतर प्रमाणे अत्यंत अचूकपणे पाळण्यात येऊन ही चाचणी यशस्वी करण्यात आली.
खालील उच्च तंत्रज्ञानाचा वापर :
- अत्यंत अचूक नेव्हीगेशन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर
- सुडोलाईट सिस्टीम (हवेतील स्थान अचूकपणे निश्चित करण्यासाठी)
- का-बँड रडार अलटिमिटर
- नाविक रिसिव्हर
- स्वदेशी बनावटीचे लँडिंग गिअर
- एअरोफॉईल हनिकोंब फिन्स
- ब्रेक पॅराशूट सिस्टिम
- डिजिटल एली व्हेशन मॉडेल
ISRO : Indian Space Research Org (भारतीय अवकाश संशोधन संस्था)
स्थापना :- 15 ऑगस्ट 1969
संस्थापक :- विक्रम साराभाई
मुख्यालय :- बंगळुरू
अध्यक्ष :- एस. सोमनाथ (10 वे)




