Shopping cart

shape
shape

कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान

  • ब्रिटनमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीमध्ये मजूर पक्षाने (लेबर पार्टी) 650 सदस्यीय कनिष्ठ सभागृहामध्ये 412 जागांवर विजय मिळवत तब्बल 14 वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले.
  • पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ हुजूर पक्षाचा (कॉन्झव्हेंटिव्ह) ऐतिहासिक पराभव झाला.
  • मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील.
  • स्टार्मर यांनी सन 2019मध्ये जेरेमी कॉर्बिन यांच्याकडून मजूर पक्षाची धुरा स्वीकारली होती.
  • स्टार्मर 2015 पासून होलबोर्न अँड सेंट पँक्रासचे खासदार आहेत.
  • स्टार्मर गॉर्डन ब्राउन नंतरचे पहिले मजूर पक्षाचे पंतप्रधान आहे.
  • स्टार्मरचा जन्म 2 सप्टेंबर, 1962 रोजी साउथवार्क, लंडन येथे झाला.
  • त्यांचे बालपण सरेमधील ऑक्स्टेड शहरात गेले. त्यांचे आईवडील मजूर पार्टीचे समर्थक होते.
  • वडील हे साधे कामगार होते, तर आई एका रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करत होती.
  • कीर स्टार्मर हे तरुण – वयापासून राजकारणात सक्रिय होते.
  • समाजवादी विचारधारेचा प्रभाव असल्याने त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी लेबर पक्षात प्रवेश केला होता.
  • कीर स्टार्मर यांना शिक्षणामध्ये विशेष गती होती.
  • लीड्स विद्यापीठातून त्यांनी कायदे शाखेची पदवी घेतली तर प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी नागरी कायद्याबाबत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.
  • प्रत्यक्ष वकील म्हणून काम करत असताना त्यांनी मानवी हक्काचा पुरस्कार केला.
  • उत्तर आयर्लंड नियोजन मंडळाचे मानवी हक्क सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.
  • त्यांची 2002 मध्ये राणीच्या परिषदेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
  • ते 2008 ते 2013 या काळामध्ये जनसुनावणी विभागाचे संचालक होते.
  • ते 2015 मध्ये हॉलबॉर्न आणि सेंट पॅनक्रास येथून हाउस कॉमन्सचे सदस्य म्हणून निवडून आले.
  • हे दोन्ही मतदारसंघ मजूर पक्षाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात.

या धोरणाचा पुरस्कार:

  • आर्थिक स्थैर्य अन् वृद्धी
  • आरोग्य सेवेतील सुधारणा
  • सीमा सुरक्षेवर भर
  • ऊर्जा पुरवठ्याचे राष्ट्रीयीकरण
  • समाजविरोधी घटकांना पायबंद
  • शिक्षकांची भरती
  • भारताशी मैत्रीवर भर, मुक्त व्यापाराचा पुरस्कार
  • इस्त्राईलला शस्त्रे देण्यास विरोध, पॅलेस्टाईनला पाठिंबा

पक्ष निहाय जिंकलेल्या जागा:

  • एकूण जागा – 650
  • बहुमतासाठी – 326
  • मजूर पक्ष – 412
  • हुजूर पक्ष – 121
  • लिबरल डेमोक्रॅट्स – 71
  • एसएनपी(स्कॉटिश नॅशनल पार्टी) – 9
  • एसएफ(सिन फेईन) – 7
  • इतर – 28

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *