Shopping cart

shape
shape

भारत विश्वविजेता

  • 9 व्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने द. आफ्रिकेचा पराभव करीत विजेतेपद पटकावले.
  • भारताचे टी – 20 प्रकारातील हे दुसरे विजेतेपद ठरले. याआधी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या पहिल्या वहिल्या टी-20 स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
  • 2024 च्या टी – 20 स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावले. स्पर्धेत भारतीय संघाने 8 सामने खेळले आणि आठही सामने जिंकले.
  • या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या दोन संघाविरुद्ध हॅट्रिक नोंदवून एकाच स्पर्धेत दोन वेळा हॅट्रिक नोंदवणारा पहिलाच खेळाडू ठरला.

20 टी -वर्ल्ड कप – 2024

  • विजेता: भारत
  • उपविजेता: द. आफ्रिका
  • स्पर्धा: 9 वी
  • ठिकाण: अमेरिका – वेस्ट इंडिज
  • अंतिम सामना: बार्बाडोस(ब्रिजटाऊन), वेस्ट इंडिज
  • सहभागी संघ : 20
  • स्पर्धेचा कालावधी: 1 ते 29 जून
  • विजेत्या संघाचा कर्णधार: रोहित शर्मा
  • उपविजेत्या संघाचा कर्णधार: ऍडम मार्करम
  • प्लेअर ऑफ द सिरीज : जसप्रीत बुमरा(भारत) – कमी इकॉनॉमीसह 15 बळी
  • प्लेअर ऑफ द मॅच: विराट कोहली(अंतिम सामन्यात 76 धावा)
  • सर्वाधिक धावा: रहमानुल्ला गुरबाज(281 धावा) – अफगाणिस्तान
  • सर्वाधिक बळी: 1)फझलहक फारुकी (17 बळी) – अफगाणिस्तान  2)अर्षदीप सिंग (17 बळी)- भारत
  • स्पर्धेचे बसदिच्छादूत : युवराज सिंग,ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, उसेन बोल्ट
  • स्पर्धेचे सुरवात : 2007
  • पहिले विजेते: भारत
  • आयोजक : आयसीसी
  • 2022 चे विजेते: इंग्लंड
  • आगामी स्पर्धा : 2026(भारत, श्रीलंका)

टी-20 क्रीडाप्रकारात सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणारे देश

  1. वेस्ट इंडिज (2012, 2016)
  2. इंग्लंड (2010, 2022)
  3. भारत (2007, 2024)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *