राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात नव्या राजकीय पक्षांची नोंद करण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात राज्य निवडणूक आयोगाकडे तब्बल 45 नव्या राजकीय पक्षांची नोंद झाली आहे.
अधिक माहिती
● डिसेंबर 2022 मध्ये राज्यात 351 राजकीय पक्ष होते.
● डिसेंबर 2023 पर्यंत त्यांची संख्या 376 इतकी झाली. आता ती संख्या 396 वर पोचली आहे.
● राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियमन करतो.
● स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना उमेदवार उभे करताना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
● निवडणुक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करावी लागते.



