भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली कारकीर्दीत चौथ्यांदा ‘आयसीसी’ च्या सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. 2023 वर्षात मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कोहलीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. वर्षभरात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता.
अधिक माहिती
● कोहलीने 2023 वर्षात सहा शतके, आठ अर्धशतकांच्या मदतीने 1377 धावा केल्या.
● सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला मिळणारा ‘सर गारफिल्ड सोबर्स करंडक’ यंदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पटकावला.
● विराटने 2012, 2017, 2018व 2023 अशी चार वेळा वन डे तील सर्वोत्तम खेळाडूची ट्रॉफी जिंकली आणि असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
● शिवाय त्याचा हा 10वा आयसीसी पुरस्कार आहे आणि जगात एकमेव खेळाडू ज्याने एवढी पुरस्कार जिंकली आहेत.
विराट आणि आयसीसी पुरस्कार
● दशकातील सर्वोत्तम खेळाडू
● 2017 व 2018 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
● दशकातील सर्वोत्तम वन डे तील खेळाडू
● वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार चार वेळा
● 2018 मध्ये कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
● 2019 मध्ये स्पिरिट ऑफ दी इयर पुरस्कार.
आयसीसी पुरस्कार विजेत्यांची नावे (2023)
● सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू – पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
● सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – नॅट सिव्हर बँट (इंग्लंड)
● सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू – उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
● सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू – विराट कोहली (भारत)
● सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू – चामरी अटापट्टू (श्रीलंका)
● सर्वोत्तम पुरुष टी-२० क्रिकेटपटू – सूर्यकुमार यादव (भारत)
● सर्वोत्तम महिला टी-२० क्रिकेटपटू – हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीज)
● सर्वोत्तम युवा पुरुष खेळाडू – राचिन रवींद्र (न्यूझीलंड)
● सर्वोत्तम युवा महिला खेळाडू – फोबे लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)



