देसिया मुर्पोक्कू द्रविड कळघमचे (डीएमडीके) संस्थापक आणि लोकप्रिय तामिळ अभिनेते विजयकांत यांचे चेन्नईतील रुग्णालयात वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. विजयकांत यांना त्यांच्या उदार वृत्तीमुळे त्यांचे चाहते-प्रशंसक त्यांना ‘करुप्पू एमजीआर’ या टोपण नावाने संबोधत.
अधिक माहिती
• ते दीर्घकाळ आजारी असल्याने गेल्या चार-पाच वर्षांपासून ते राजकारणातही सक्रिय नव्हते.
• त्यांची पत्नी प्रेमलता यांनी 14 डिसेंबर रोजी औपचारिकरित्या पक्षाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांना पक्षाच्या बैठकीत सरचिटणीस म्हणून घोषित केले.
• 1991चा गाजलेला तमिळ चित्रपट ‘कॅप्टन प्रभाकरन’मध्ये भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकाऱ्याची भूमिका साकारल्यानंतर विजयकांत ‘कॅप्टन’ म्हणून लोकप्रिय झाले.
• त्यांचा जन्म मदुराई येथे के. एन. सक्रिय अलागरसामी आणि अंदाल यांच्या पोटी झाला.
• या प्रसिद्ध अभिनेत्याने 2005 मध्ये राजकारणात प्रवेश केला.
• पक्ष स्थापनेच्या एका वर्षानंतर, 2006 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सुमारे 8.40 टक्के मते मिळाली व विजयकांत उत्तर तामिळनाडूतील विरुधाचलममधून जिंकून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.



