उद्दिष्ट
• देशातील हळद उद्योगाचा विकास आणि विस्तार वाढवणे हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे.
• राष्ट्रीय हळद मंडळाच्या उपक्रमामुळे 2030 पर्यंत हळदीची निर्यात एक अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल अशी अपेक्षा आहे.
अधिक माहिती
• या मंडळात केंद्र सरकारने नियुक्त केलेले एक अध्यक्ष आणि आयुष मंत्रालय औषध निर्माण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, केंद्र सरकारची वाणिज्य आणि उद्योग यासह प्रमुख सरकारी विभागाचे सदस्य आणि राज्य सरकारच्या तीन फिरत्या वरिष्ठ प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
• भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक ग्राहक आणि निर्यातदार आहे.
• 2022- 23 मध्ये भारतात 3.24 लाख हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली होते तर उत्पादन 11.61 लाख टन म्हणजेच जागतिक हळदी उत्पादनाच्या 75 टक्के पेक्षा जास्त होते.
• हळदीच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा 62% पेक्षा जास्त आहे.
• भारतीय हळदीची प्रमुख निर्यात बाजारपेठ बांगलादेश अमेरिका आणि मलेशिया आहेत.
• हळदीच्या 30 पेक्षा जास्त जाती भारतात उगवल्या जातात आणि देशातील 20 पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि तमिळनाडू ही प्रमुख हळद उत्पादक राज्य आहेत.



