• राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो.
• इ.स. 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
• हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.
o सुरक्षेचा हक्क
o माहितीचा हक्क
o निवड करण्याचा अधिकार
o म्हणणे मांडण्याचा हक्क
o तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
o ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार
• ग्राहकांच्या अधिकाऱ्यांची त्यांना जाणीव व्हावी आणि संपूर्ण माहिती मिळावी, या अनुषंगाने जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्राहक दिन साजरा केला जातो.
• ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदारीची मुख्यतः जाणीव करून देणे, हाच या दिवसामागचा उद्देश आहे.
• ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आल्यानंतर ग्राहकांनी जास्तीत-जास्त वापर केला पाहिजे. म्हणूनच, 1991, 1993, 2002 आणि 2020 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली.



