Shopping cart

shape
shape

23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन

शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २३ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी भारतात ‘शेतकरी दिन’ साजरा केला जातो.

• शेतकऱ्यांचे नेते म्हणून लोकप्रिय असेलल्या चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस ‘शेतकरी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
• देशाच्या संसदेत शेतकऱ्यांसाठी चौधरी चरण सिंह आवाज बुलंद केला होता. चौधरी चरण सिंह हे 28 जुलै 1979 पासून 14 जानेवारी 1980 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.
• चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव चौधरी मीर सिंह होतं. चौधरी चरण सिंह लहान असतानाच त्यांचं कुटुंब जानी परिसरात स्थायिक झालं.
• त्यांनी आग्रा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं. यानंतर गाझियाबादमध्ये काही काळ वकिली केली होती. महात्मा गांधींजींचा त्यांच्यावर प्रभाव होता.
• चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची कामं केली. त्यांच्यामुळेच आज शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यांनी जमीनदारी रद्द केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवलं. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची सेवा केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *