ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. खेळाडूंच्या लिलावात सर्वाधिक 24.75 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून कोलकत्ता नाईट रायडर्स ने स्टार्कला आपल्या संघात घेतले.
• ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क बरोबरच 2023 चे एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद जिंकून देणारा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने 20.50 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले.
• भारतीयांमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा मान वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने मिळवला.
• हर्षल पटेलला पंजाबच्या संघाने 11.75 कोटी रुपयात खरेदी केले.
• याआधी इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करण आयपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला पंजाब किंग संघाने 18.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते.



