तेलंगणा राज्याचे दुसरे आणि काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत मल्लू भाटी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांनी रेवंत रेड्डी व विक्रममार्क यांच्यासह सर्व मंत्र्यांना पद आणि गोपीनीयतेची शपथ दिली. हैदराबाद येथील लालबहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये शपथविधी सोहळा पार पडला.
रेवंत रेड्डी यांचा अल्पपरीचय
• रेवंत रेड्डी जन्म : 8 नोव्हेंबर 1969
● ते तेलंगणा विधानसभेतील कोडंगल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
● ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) पक्षाचे आहेत.
● रेवन्त रेड्डी यांनी विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे.
● त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
● 2007 मध्ये ते सक्रिय राजकारणात आले. सुरुवातीला ते अपक्ष म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले त्यानंतर तेलुगू देशम पक्षात प्रवेश केला.
● 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाकडून ते कोडंगल मतदारसंघातून निवडून आले.
● त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये तेलुगु देशम सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र 2018 ची विधानसभा निवडणूक ते काँग्रेसकडून हारले.
● नंतरच्या वर्षी 2019 ला झालेली लोकसभा निवडणूक मात्र त्यांनी मलकाजगिरी मतदार संघातून लढवली व ती 10, 919 मतांनी जिंकली.
● जून 2021 मध्ये त्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली.
● त्यानंतर गेली दोन वर्ष ते सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे सरकार व के.सी. चंद्रशेखरराव यांच्या घराणेशाहीविरुद्ध आक्रमकपणे प्रचार करत होते.
● राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तेलंगणामध्ये प्रतिसाद मिळवून देण्यातही त्यांचा मोठा हातभार होता.



