जागतिक माध्यम विश्वातील प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसीच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे माध्यम तज्ञ डॉक्टर समीर शहा यांची निवड करण्यात आली आहे. शहा यांना दूरचित्रवाणी निर्मिती आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील 40 वर्षांचा अनुभव आहे. बीबीसी चे अध्यक्षपदासाठी शहा यांच्या नावाची शिफारस ब्रिटन सरकारकडूनच करण्यात आली होती. शहा यांना 2019 मध्ये ‘सीबीई’ (कमांडर ऑफ द मोस्ट एक्स्टलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) या सन्मानाने राणी एलिझाबेथ (द्वितीय)यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. शहा हे आता रिचर्ड शार्प यांची जागा घेतील. बीबीसीचे सूत्रे हाती घेण्यापूर्वी शहा यांची हाऊस ऑफ कॉमन्स मीडिया कल्चर आणि माध्यम आणि क्रीडा क्षेत्रातील निवडी पूर्वीच्या पडताळणी समितीमधील खासदार हे उलट तपासणी करतील.
समीर शहा
● समीर शहा यांचा जन्म 1952 या वर्षी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे.
● पुढे ते करिअर निमित्त 1960 यावर्षी इंग्लंडला आले.
● ते याआधी बीबीसीच्या चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रमाचे प्रमुख होते.
● दूरचित्रवाणी आणि नभोवाणीच्या निर्मिती क्षेत्रातील जुनीपर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
● 2007 ते 2010 या काळामध्ये बीबीसी चे बिगर कार्यकारी संचालक होते.



