- केंद्रीय वने पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान वनांवरील संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा भाग म्हणून बैठकीचे आयोजन केले आहे.
- यात 40 पेक्षा अधिक देश आणि 20 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून वैयक्तिक आणि ऑनलाईन पद्धतीने 80 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.
- संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 2017 ते 2030 या कालावधीसाठी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांची जंगल विषयक धोरणात्मक योजना स्वीकारली आहे.
- सर्व प्रकारच्या जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याकरिता ही धोरणात्मक योजना प्रत्येक स्तरावर एक जागतिक आराखडा म्हणून कार्य करते.
- यात जंगलाबाहेरील झाडांचा देखील समावेश आहे तसेच जंगलतोड आणि जंगलांचा ऱ्हास यांचा सामना करण्यासाठी देखील मार्गदर्शक आहे.
- मध्यप्रदेशचे ‘वणवा नियंत्रण मॉडेल’ देशभरात लागू केले जाणार
- मध्य प्रदेशचे ‘ वणवा नियंत्रण मॉडेल’ देशभरात लागू केले जाणार आहे .
- या मॉडेलमध्ये वन कर्मचाऱ्यांना मोबाईल मधील ॲपद्वारे आगीची माहिती मिळते.
- छत्तीसगड राज्यातही हे मॉडेल लागू करण्यात आले आहे.
- या मॉडेलचा वापर करून जंगलातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात आले.



