- पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये होणाऱ्या ‘बॅस्टील डे’ संचलनासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
- परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार या संचलनात भारतीय सशस्त्र दलातील एक पथकही सहभाग होणार आहे.
- हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिन असून त्याला ‘बॅस्टील डे’ असेही म्हणतात. तो दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा केला जातो.
- भारत – फ्रान्स व्यूहात्मक परस्परसंबंधांच्या रौप्यमहोत्सवानिमित्त फ्रान्सचे अध्यक्ष इम्यान्यूएल मॅक्रोन यांनी ‘बॅस्टील डे’ संचलनसमयी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे मोदींना निमंत्रण दिले होते.



