Shopping cart

shape
shape

17 एप्रिल : जागतिक हिमोफिलिया दिन

  • Home
  • Current Affairs
  • 17 एप्रिल : जागतिक हिमोफिलिया दिन

दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया महासंघाद्वारे साजरा केला जातो.

हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांच्या गंभीर समस्येबद्दल जनजागृती करण्याचा हा दिवस आहे.

हिमोफिलिया हा एक असा जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर त्याचे रक्त वाहणे थांबतच नाही. म्हणजेच अशा व्यक्तीला किरकोळ दुखापत होऊनही त्याचे रक्त थांबत नाही आणि अतिरक्तस्रावामुळे त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

17 एप्रिललाच का केला जातो साजरा:

जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया महासंघातर्फे पाळला जातो.

जागतिक हिमोफिलिया दिनाची सुरुवात 1989 मध्ये झाली

17 एप्रिल हा दिवस हिमोफिलियाच्या जागतिक महासंघाचे संस्थापक फ्रँक श्नबेल यांच्या जन्मदिनानिमित्त पाळण्यात आला.

रक्तस्त्राव विकार असलेल्या लोकांना शिक्षित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

वर्ल्ड फेडरेशन जगभरातील लोकांना या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी एकता दर्शविण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

हिमोफिलिया आणि रक्ताशी संबंधित विकार असलेल्या लोकांमध्ये जनजागृती करणे हे या दिवसाचे महत्त्व आहे.

गंभीर रुग्णांमध्ये स्नायू, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो.

हा एक अनुवांशिक आजार आहे, जो मुलाला त्याच्या पालकांकडून होतो. त्यामुळे लवकर निदान झाल्यास रुग्णाला या आजाराबाबत जागरूक राहण्यास आणि खबरदारी घेण्यास मदत होते.

आजाराचे दुष्परिणाम :

गुडघे कोपर आणि टाचेमध्ये सूज येऊन दुखणे

सांध्यातून रक्त वाहने

त्वचेच्याखाली रक्त जमा होणे

दात काढल्यानंतर रक्त न थांबणे

नाकातून वारंवार रक्त वाहने

लघवी किंवा शौचाच्या वेळी रक्त येणे

मेंदूच्या आत रक्तस्त्रावणे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *