Shopping cart

shape
shape

NAAC मूल्यांकनात महाराष्ट्र आघाडीवर

  • Home
  • Current Affairs
  • NAAC मूल्यांकनात महाराष्ट्र आघाडीवर

विविध 35 विद्यापीठे आणि 1,834 महाविद्यालये अशा एकूण 1,869 शैक्षणिक संस्थांचे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC- National Assessment and Accreditation Council)चे मूल्यांकन पूर्ण करीत देशातील 36 राज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मूल्यांकनात पूर्ण 914 संस्थानसह कर्नाटक व 872 संस्थानसह तामिळनाडू महाराष्ट्राच्या पाठोपाठ आहेत . महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि शैक्षणिक संस्थांना NAAC मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. NAAC च्या मूल्यांकन आणि मान्यताद्वारे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा शैक्षणिक गुणवत्ता ओळखली जाते. बेंगळूर येथील NAAC द्वारे देशभरातील विविध राज्यातील विद्यापीठ महाविद्यालयांची मूल्यांकन केले जाते. मूल्यांकनात संबंधित शैक्षणिक संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी ,विद्यार्थ्यांचे निकाल, प्लेसमेंट, संशोधन कार्य, विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा, संसाधनांची स्थिती, विद्यार्थी सेवा इत्यादींची तपासणी केली जाते.

NAAC मूल्यांकनात आघाडीवरील पहिली दहा राज्य:

1) महाराष्ट्र

2)कर्नाटक

3)तामिळनाडू

4)उत्तर प्रदेश

5)गुजरात

6)पश्चिम बंगाल

7)आंध्र प्रदेश

8)हरियाणा

9)मध्य प्रदेश

10)ओडिशा

NAAC- National Assessment and Accreditation Council

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही भारतातील एक सरकारी संस्था आहे जी उच्च संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देते.

ही एक स्वायत्त संस्था आहे ज्याला विद्यापीठ अनुदान आयोगाने निधी दिला आहे

स्थापना : 1994

मुख्यालय : बेंगळुरू

घोषवाक्य : Excellence • Credibility • Relevance

अध्यक्ष :- प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *